तरडे प्रकरण
प्रथमत: झालेला प्रकार निंदणीयच आहे. याचा निषेध फक्त जान, भान, स्वाभिमान असणाऱ्यांनीच करावा?तो कशा स्वरूपात असावा हा राजकीय विषय मी माझ्या मतात मांडणार नाही.
ज्यांना जणाची ना मनाची लाज नसते... ते कुणाचीच पर्वा करत नाहीत.
किंमान तरडेंनी असं करावं याचं वाईट वाटतं?ते मी संविधानाप्रति असलेल्या श्रध्दा, अंधश्रद्धा याचेपोटी म्हणतच नाही. आणि म्हणणारही नाही.
तरडेंना शिक्षा झाली अथवा नाही झाली तरी माझा मुद्दा, माझे मत ते नाहीच. मीही सर्वसामान्य युवक आहे.
तरडेंच संख्याबळ मोठं, गॉडफादर मोठा, सरकार त्याचे, न्यायपालिका त्याची, काय करील संविधान असे म्हणणारेही भरपूर भेटले. कुणाच्या तोंडाला हात लावू शकत नाही. कुणाच्या तोंडात तडका देऊ शकत नाही.
कारण आज जन्माला आलेली पोरं जन्मदात्या आईबापाला ही काय केलं आमुच्यासाठी म्हणतात ना.. तेंव्हा निरूत्तर आईबाप गुन्हेगार वाटले तरी... आपण ज्यावेळी आई बाबा बनतो ना तेंव्हा.. त्या माती आड गेलेल्या आईबाबांचा गुन्हेगार हा शिक्का कसा पुसणार हा प्रश्न आहे?
मोदीजी भारतीय संविधानविरोधी भाष्यच करणार नाहीत. करूही शकत नाहीत. कारण ते स्वतः पालक आहेत. या देशाची माय माऊली ही आहेत. आईबाबांना सगळी मुले सारखीच.
कांहीं लोक संविधानाला दोष देतात?संविधान हटवा म्हणतात?
आरक्षण भिक आहे म्हणतात? आरक्षण रद्द करा म्हणतात?
मंदिर वही बनाएंगे म्हणतात? आला रे आला कोरोना आला म्हणतात?
खाजगीकरण आले? कंपनीकरण आले? हळूहळू आरक्षण घालविले जातेय? शिक्षणाचे बाजारीकरण झाले?आरोग्याचे बाजारीकरण झाले.
आता न्यायव्यवस्थेचे आणि सरकारचेही व्हावे ही इच्छा... कांही दिवसात तीही नि:संशय पूर्ण होईल?
धर्मनिरपेक्ष संविधानाला आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलेले आहे?का तर फक्त तरडेंनी संविधानावर पाट आणि पाटावर गणपती ठेवला म्हणून? कांही जण म्हणतात PDPचे (काश्मिर)मुस्लिम नेत्याने संविधान फाडले काय केले? मग आम्ही कुठे फाडले काय?
हे पहा मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीयच आहे.
आणि कोणताही अस्सल भारतीय हा मुर्खपणा करूच शकत नाही आणि करणारही नाही.
संविधानामुळे कोणाला त्रास होतोय हे जगविख्यात आहे.
पुर्वी मुक्या आवाजांना वाचा नसल्याने अतोनात छ्ळ झाले. त्याची परिसिमा एवढी की इथल्या दगडांनाही पाझर फुटले. त्या पाझर फुटलेल्या दगडांवर आम्ही आमुच्या दुःखांचं ओझं टाकले. मागासवर्ग म्हणून हिणवणाऱ्यांनी बलाढय हत्तीवर लहानपणीच, समज नसताना पायाला साखळदंड बांधून, ताब्यात ठेवण्याची सवय लावली. तसाच प्रकार सद्या मोठया प्रमाणात होतो आहे.
आम्हाला वेळोवेळी जाणिव करुन देण्याचा अयशस्वी मनुवादी प्रयत्न केला जात आहे. मानसिक गुलाम करण्याचा प्रयत्न केला जातोय.
ज्या- ज्या गोष्टींमुळे मागासवर्गियांचा विकास झाला त्यां त्या गोष्टी मागासवर्गिय द्वेष असणारे लोक, लोकसेवक जाणिवपुर्वक नष्ट करतात. हे शाश्वत सत्य आहे.
या मागासवर्गियांचा द्वेष करणाऱ्यांचं फक्त कांही दिवसच चालणार आहे?हे पण तितकेच त्रिकालाबाधित शाश्वत सत्य आहे.
मला व्यक्ती,वर्ण, जात यांचा व्देष करणे आवडत नाही. मात्र जात, भेद असावेत याचा मी निक्षून विरोधच करीन.
तरडेंनी झालेल्या चुकीची माफी मागून पडदा पडला. त्यांना आत्मक्लेश झाला. प्रश्न मिटला. परंतु तरडेंनी केलं मग मीच का नाही.. या विचारांची, धारणेची उत्पत्ती होईल त्याचं काय?
शिवाय तरडेंनी RSS चे सेवक असल्याचे कांही दिवसांपुर्वीच अभिमानाने सांगितले. यातही माझी हरकत नाहीय. त्यांनी कसे असावे हे मीच काय कोणीच ठरवू शकत नाही. त्यांनी काय करावे हे पण ठरवू शकत नाही. काय करतात, किंवा करणार आहात हे पण मी विचारू शकत नाही.
मात्र हे पहा, मी काय करतोय, कसे करतोय, का करतोय, असं सांगून एक प्रकारे कोणाच्या तरी विश्वास (Faith)चा घातच करतात ना?शिवाय मिशीला पिळ देऊन अधिकच उद्युक्त करत असल्याचे चित्र निर्माण करतात.
तरडे हे खुप विचारशील आहेत, संवेदनशिलही आहे. त्यांना सामाजिक, राजकीय भान आहे.
मात्र ते सजग असल्याने त्यांनी हे विसरता कामा नये की त्यांना प्राप्त बुध्दी, ज्ञान ही एक दुधारी तलवार आहे.
या तलवारीवरच ठरतं.
वाल्याचा वाल्मिकी करायचा की नाही?
रामाचा परशुराम करायचा की नाही?
अशोकाचा चंडकोशक करायचा की नाही?
अहिंसकाचा अंगुलीमाल करायचा की नाही?
तेंव्हा त्यांनी नक्कीच मानवतावादी धोरणांतून इथून पुढे गांभिर्याने विचार करावा ही कळकळीची विनंती.
त्यांचे चित्रपटांतून खुप शिकण्यासारखं आहे. त्यांनी झालेल्या कृतीबद्दल माफी तात्काळ मागून , त्यांच्यातील मोठेपणाचे जिवंत उदाहरण दिलेले आहे.
मात्र ! मात्र !!
करंगळीची मांडी करणाऱ्यांनी बाऊ करणे थांबवायला हवे. आजकाल अशा अंध विरोधक आणि तरडे समर्थकांचीच जास्त भिती वाटू लागलीय. कोणीच कोणाला कमी नाही?हा प्रश्नच नाही... तर आपल्यातच लावून देऊन कोण टाळ्या वाजवत आहे?हे या गोंधळात ऐकणे थोडे अवघड जातेय?
हे पहा संविधान धर्मनिरपेक्ष आहे. प्रत्येकाला ते आपलेच वाटते हीच तर संविधानाची यशस्वीता आहे. आणि असावी यासाठी प्रत्येकांनीच सजग असायला हवे होय ना?
मात्र चुकीसाठी केवळ ठराविकच लोक का रस्त्यावर येतात?हा मुर्खपणाचा प्रश्न उपस्थित केला जातो आहे?
खरेतर तरडे माफी मागून मोकळे झाले.परंतू नेहमीप्रमाणे दलितांच्या भावना दुखावल्याने माफी मागत असल्याचा निर्वाळा करून.. संविधान हे दलिताने लिहिल्याने फक्त दलितांचेच या भंगार भावनेला हेतूपुरस्सर खतपाणी घातले.... आणि निम्मे सैन्य शब्दांनीच घाळ केले.. हे निश्चितही केले.
कदाचित हिंदूराष्ट्र
प्रांजल सर. इथे भारतरत्न दिलाय म्हणून रागाचा वचपा काढत आहात काय आपण? भारतरत्न कोणी ? कोणाला? का? द्यायचा हे जर तुमच्या अखत्यारितील तरी बाब आहे काय?
संविधान म्हणजे प्रेमग्रंथ, आत्मकथा, की धर्मग्रंथ वाटतो काय?मुळात भारतरत्न कुणाला?व का? दिला जातो हे कधी पाहीले आहे काय? केवळ प्रश्नांचेही इथे कॉपी पेस्ट करू नका.
डॉ. राधाकृष्णनजी सर्वपल्ली यांचेपासून ते स्वर्गिय, माजी पंतप्रधान अटलजी वाजपेयी साहेब यांचे सारखेच आजवर 45 रत्ने भारतरत्नांनी सन्मानित केले केले आहेत. तीन जणांना जे भारतीय नसूनही त्यांना भारतरत्न दिला याचेही भान ठेवावे.
* **भारतरत्न** हा देशाचा सर्वात **मोठा** **नागरी सन्मान** असून जीवनच्या कुठल्याही क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी तो दिला जातो.
* 👉***सेवा*** (सेवा ची निर्मिती सुरू आहे - विकिपीडिया, ******कला*** (https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE)***, ******साहित्य*** (https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF)***, ******विज्ञान*** (https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8)*** व ******विश्वशांती*** (विश्वशांती ची निर्मिती सुरू आहे - विकिपीडिया, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा अमूल्य ******पुरस्कार*** (https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0)***देऊन गौरवायचे, असा निर्णय इ.स. १९५४ मध्ये तत्कालीन ******भारत सरकारतर्फे*** (https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0)*** घेण्यात आला.***
* 👉***२०१४ मध्ये वरील क्षेत्रांबरोबरच ******क्रीडा*** (https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE)*** क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले. ***
आता वरिलपैकी कोणत्याच निकषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसत नाहीत काय? आणि नसतील बसत हे निदर्शनास आणून देऊन तुम्ही भारतरत्न परत घेण्याची मागणी करा.
उगाच आगीत तेल घालण्याचे काम करत जाऊ नका.
https://youtu.be/Ux0DLIruZ8Mप्रत्येक वेळी केवळ मागासवर्गियांनाच गुणवत्ताहीनां पुढे स्वतःची क्षमता, विद्वता, गुणवत्ता सिद्ध करायची गरजच काय?
संविधानाबद्दल टिप्पणी करण्यापुर्वी हे लक्षात घ्यावं :
https://youtu.be/48W1T6Z4EF8सन 199O सालीच्या घटना काळात डॉ. बाबासाहेब हयात होते काय?
सत्ता कोणाची होती, स्वतःला नाचायला जमलं नाही की अंगण वाकडं व्वारे व्वा !
मोदीजी श्रेष्टच आहेत यामध्ये दुमतच नाहीय. मात्र त्याचे भक्त नव्हे कांही अंधभक्त तकलादू बिनबुडाचे आणि असंवेधानिक वक्तव्य करतात. ज्याला मोदीजीही नक्कीच समर्थन करणार नाही.
ज्या उदाहरणाची तुम्ही गोष्ट करताय ना त्याचा मागचा इतिहासपण बघा.
जम्मू, लेह-लदाख, काश्मिर संस्थानिक इतर संस्थानिक यांचेसारखे विलीन व्हावे ही चर्चा असताना पाकीस्थानने काश्मिर खोऱ्यात 20 किमी अतिक्रमण केले होते. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सल्ल्यावरून महार रेजिमेंटने पाक सैन्याला 100 किमी मागे हाकलून दिले होते. हे विसरता काय. नेहरूजींच्या विदेशी नितीच्या अज्ञानातून 370 मुद्दा उपस्थित झाला. याकडे जाणून बुझून दुर्लक्ष केले जातेय का?
देशाच्या प्रगतीला सक्रीय नेत्यांचं श्रेय देऊन 56 इंच छाती आपण फुगविणारे.. अपयशाचे शितोंडे मात्र संविधानावर उडवतात. धन्य बुवा?
Comments
Post a Comment