तरडे प्रकरण
प्रथमत: झालेला प्रकार निंदणीयच आहे. याचा निषेध फक्त जान, भान, स्वाभिमान असणाऱ्यांनीच करावा?तो कशा स्वरूपात असावा हा राजकीय विषय मी माझ्या मतात मांडणार नाही. ज्यांना जणाची ना मनाची लाज नसते... ते कुणाचीच पर्वा करत नाहीत. किंमान तरडेंनी असं करावं याचं वाईट वाटतं?ते मी संविधानाप्रति असलेल्या श्रध्दा, अंधश्रद्धा याचेपोटी म्हणतच नाही. आणि म्हणणारही नाही. तरडेंना शिक्षा झाली अथवा नाही झाली तरी माझा मुद्दा, माझे मत ते नाहीच. मीही सर्वसामान्य युवक आहे. तरडेंच संख्याबळ मोठं, गॉडफादर मोठा, सरकार त्याचे, न्यायपालिका त्याची, काय करील संविधान असे म्हणणारेही भरपूर भेटले. कुणाच्या तोंडाला हात लावू शकत नाही. कुणाच्या तोंडात तडका देऊ शकत नाही. कारण आज जन्माला आलेली पोरं जन्मदात्या आईबापाला ही काय केलं आमुच्यासाठी म्हणतात ना.. तेंव्हा निरूत्तर आईबाप गुन्हेगार वाटले तरी... आपण ज्यावेळी आई बाबा बनतो ना तेंव्हा.. त्या माती आड गेलेल्या आईबाबांचा गुन्हेगार हा शिक्का कसा पुसणार हा प्रश्न आहे? मोदीजी भारतीय संविधानविरोधी भाष्यच करणार नाहीत. करूही शकत नाहीत. कारण ते स्वतः पालक आहेत. या देशाची माय माऊली ही आहेत....