भारताला इंग्रजीमध्ये इंडिया असे का म्हणतात?
इंडिया या शब्दाला फार फार मोठा इतिहास आहे. इंडिया हा शब्द तयार झाला त्यामागे प्रमुख कारण म्हणजे भारत, इराणमधील पर्शियन साम्राज्य व प्राचीन ग्रीक यांमधील संबंध.
प्राचीन भारतातील महाजनपदे आणि इराणमधील अखमोनिय(Achaemenid Empire) ,पर्शियन साम्राज्यामध्ये व्यापारी व राजकीय संबंध होते. पर्शियन साम्राज्याचा राजा 'दुसरा दार्युश'(Darius -II) याने पंजाब व सिंध जिंकून पर्शियन साम्राज्याला जोडले होते. हा दुसरा दार्युश फार महत्वाकांक्षी असल्यामुळे त्याने ग्रीक बेटांवर हल्ले करून बराचसा भाग जिंकला. त्याच्या या आक्रमनाविरुद्ध आयोनियन बेटांवरील ग्रीकांनी विशेष लढा दिला
या अखमोनिय साम्राज्याची 'प्राचीन पर्शियन' ही मुख्य भाषा होती. या अखमोनिय( पर्शियन) सम्राटांच्या कोरीव लेखांमध्ये भारतीय उपखंडातील लोकांचा उल्लेख हिदुश, हृदश असा केलेला आहे.(पर्शियन साम्राज्याच्या भारतीय भागाचा उल्लेख हिदुश असाच केलेला आहे)
ग्रीक बोलीभाषेमध्ये शब्दाच्या सुरवातीस आलेल्या 'ह' चा उच्चार केला जात नाही त्यामुळे हिदुश चे इंदोस हे एकवचनी आणि इंदोइ हे अनेकवचन रूप झाले ( स्कायलॅक्स ऑफ कार्यांदा या नावाचा ग्रीक खलाशी होता तो भारतापर्यंत पोहोचणारा पहिला आयोनियन ग्रीक होता. त्याच्या प्रवासाचा वृत्तांत ' पेरीप्लस ऑफ स्कायलॅक्स या नावाने प्रसिद्ध आहे त्यात वरील इंदोस/ इंदोइ असा उल्लेख आलेला आहे)
पुढे हिरोडोटस ( ज्याला इतिहासलेखनाचा जनक म्हटले जाते) त्याने इंदोस/इंदोई हे शब्द पर्शियन हिदुश, हृदश या शब्दांना समानार्थी वापरले
इंडिया या शब्दाचे मूळ या ग्रीक आणि पर्शियन शब्दांमध्ये आहे. हिंदू/हिंदुस्थान हे शब्दसुद्धा या पर्शियन शब्दांतूनच आले असावेत
पण व्हॉटसअप युनिव्हर्सिटी नुसार INDIA stands for "Indipendant Nation Decleared In August ". 😅😅😂😂🤦
सुंदर व सत्य ऊत्तर. ते लोक सप्ता ला हप्ता म्हणतात.
हिंदु ही अरबांनी दीलेली शिवी आहे असा प्रचार करणा-या बी ग्रेड व सी ग्रेड लोकांना हे ऊत्तर पटणार नाही.
Comments
Post a Comment